घनसोलीत घडलेला खून खोपोली मध्ये झाला उघड

प्रतिनिधी सचिन श्रीवास्तव


नवी मुंबई:- आपल्या पत्नीवर चारित्र्याचा संशय घेत ओढणीने गळा दाबून तिची हत्या करण्याची धक्कादायक घटना नवी मुंबईतील घणसोली या ठिकाणी घडली २२ जुलै रोजी राबाले पोलीस ठाण्यात पती अंबुज तिवारी व पत्नी नीलम तिवारी व कोठेतरी निघूनगेल्याची तक्रार आरोपीच्या वडिल महेंद्र तिवारी यांनी दिली होती. त्यानुसार पोलिसांनी शोध घेतला असता २८ जुलै रोजी अंबुज तिवारी ला पोलिसांनी ताब्यात घेतले या वेळी अंबुजची चौकशी केली असता आपणच पत्नी नीलम चा ओढणीने गळा दाबून खून केला असून मृतदेह ड्रम मध्ये टाकून आपला मित्र श्रीकांत चौबे यांच्या टेम्पो ने मुंबई पुणे हायवे वर खोपोली जवळ मृतदेह फेकल्याचे मान्य केले. पोलिसांनी आरोपी अंबुज तिवारी व त्याचा मित्र श्रीकांत चौबे याला अटक केली असून अधिक चौकशी करण्यात येतोय.