लॉक डाऊन चे नियम धाब्यावर बसवून खैरने गावात बंदी असलेले पदार्थ उघडपणे विकले जात आहेत.

लॉक डाऊन चे नियम धाब्यावर बसवून खैरने गावात बंदी असलेले पदार्थ उघडपणे विकले जात आहेत.



अनिल काकडे सह सचिन श्रीवास्तव


नवी मुंबई:- लॉक डाऊन मध्ये आत्ता कुठे काही ठराविक दुकाने संध्याकाळी ५ वाजेपर्यंत उघडण्याची परवानगी देण्यात आली आहे. परंतु नवीमुंबई तील खैरणे गावात सर्रासपणे सर्व नियमांचे उल्लंघन केले जात असून रात्री १० वाजेपर्यंत भाजीपाला, कपड्याची दुकाने, चिकण मटण शॉप्स बिनधास्तपणे उघडी आहेत आणि याठिकाणी सोशल डिस्टेनसिंगचे तीनतेरा वाजले आहेत, सगळ्यात बाब म्हणजे तंबाखूजन्य पदार्थाच्या विक्रीवर पूर्णपणे बंदी असून सुद्धा खैरणे येथे बिनदिक्कतपणे बंदी असलेले हे पदार्थ विकले जात आहे.