पोलिसांच्या व महानगरपालिकेच्या आशीर्वादाने सुरू आहे अवैध पदार्थांचे बाजार.
कोपरखैरणेतील नागरिक मात्र बेजार.
प्रतिनिधी
सचिन श्रीवास्तव सह अभिषेक पांडेय
नवी मुंबई:- आज जिथे कोरोना संसर्गापासून वाचवण्याकरिता प्रशासनाकडून विविध उपाययोजना राबविण्यात येत आहे, ज्याकरून सर्वांचे वेळापत्रक बदलण्यात आले आहे. नवीमुंबईत विशेषतः कोपरखैरणे मध्येच मागील काही दिवसांपूर्वी खेळण्यातील बंदुकीच्या जीरावर सारस्वत बँक लुटीची घटना घडली होती व अगदी २ दिवसापूर्वीच वाहन पार्क न करू दिल्याच्या रागाने खेळण्याच्या बंदुकीनेच धमकवण्याचा प्रकार घडला आहे या सर्व प्रकारातून कोपरखैरणे पोलिसांनी काय धडा घेतला हा संशोधनाचा विषय आहे.
तिथेच जबाबदरीचा पडदा ओढणाऱ्या काही घटकांच्या आशीर्वादाने कोपरखैरणे स्थित राजधानी चौकात सायंकाळी ६ च्या सुमारास रात्री ११ वाजेपर्यंत अवैध पदार्थांचा बाजार भरवण्यात येतोय येथे दारू, गुटखा, सिगारेट उघडपणे विकण्यात येत आहे.
यामुळे राजधानी चौकात व जवळील परिसरातील वातावरण दूषित होत आहे.
लॉकडाऊनच्या चौथ्या टप्प्यात शासनाद्वारे दारू विक्रीवरील बंदी उठवताच नवी मुंबईत दारू खरेदीसाठी एक ते दोन किलोमीटरच्या रांगा लागले असे दिसून येत होत्या. एकीकडे लोकांच्या लांब रांगा कोरोनाचा प्रादुर्भाव वाढवण्यास आकडेवारीच्या वाढीस कारणीभूत ठरू शकल असत आणि दुसरीकडे या दारू खरेदीदेखील प्रशासनच्या अर्थव्यवस्थेला पुनरुज्जीवित करण्याचे एकमेव माध्यम असल्याचे दिसत होते म्हणून नवी मुंबईत दारू विक्री करण्याकरिता शासनाद्वारे दारू विक्रेत्यांना सायंकाळी ५ वाजेपर्यंत होम डिलिव्हरी करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. परंतु राजधानी चौकात अंधार होताच प्रशासन त्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष करण्याचा काम करत आहे.