कोणाच्या आशीर्वादामुळे सुरू आहेत बार व हुक्का पार्लर.
प्रतिनिधी सचिन श्रीवास्तव
नवी मुंबई:- कोरोनाचा प्रादुर्भाव सर्वत्र फैलावत पसरतोय त्यासाठी सरकारने लॉकडाऊन व आता काही मार्गदर्शन सूचना देऊन हळूहळू थोडी शिथिलता दिली आहे. कोरोना चा फैलाव वाढू नये यासाठी गर्दी होईल असे सर्वच सण समारंभ व साजरे करण्याचे काही सूचना देऊन आदेश काढले आहे, यामागचा मूळ उद्देश गर्दी न होणे व कोरोना चा प्रादुर्भाव वाढू नये हाच आहे.
असं असताना नवीमुंबईतील तुर्भे याठिकणच्या मॅफको मार्केट परिसरात धनराज बार आणि रेस्टॉरंट नामक आस्थापना सर्वच नियम धाब्यावर बसवून बिनधास्त बार चालू ठेवतात अशी धक्कादायक बाब आमच्या प्रतिनिधीच्या लक्षात आली आहे.
यात आश्चर्यकारक गोष्ट म्हणजे नवीमुंबई पोलीस उपयुक्त परिमंडळ १ यांचे कार्यलय अगदी हाकेच्या अंतरावर आहे. पोलिसांना ही गोष्ट नजरेस कशी पडत नाही की जाणुन बुजून या बार कडे दुर्लक्ष केलं जातं आहे की पोलिसांचे व या बार चालक मालकाचे आर्थिक हितसंबंध आहेत का असा गंभीर प्रश्न निर्माण होतोय. तसेच नवीमुंबई मध्ये सर्व रेस्टॉरंट बंद असताना देखील काही ठिकाणी हुक्का पार्लर सुद्धा चालू आहेत लॉकडाऊन मुळे कित्येक लोकांचे रोजगार गेले आहेत अनेक उद्योग धंदे बंद झालेत लॉकडाऊन मुळे काम धंदा नसल्यामुळे अनेक लोकांचे न भरून येणारे नुकसान झालय शहरातील इतर हॉटेल्स बार यांना फक्त पार्सल सुविधा देण्याची मुभा देण्यात आली आहे मात्र या धनराज बार व रेस्टॉरंट ला कोणाच्या आशीर्वादामुळे सूट दिली आहे का असा प्रश्न उपस्थित होतोय.