गेट समोर गाडी पार्क न करून दिल्याच्या रागात सोसायटी रहिवाशांना बंदुकीची धाक

गेट समोर गाडी पार्क न करून दिल्याच्या रागात सोसायटी रहिवाशांना बंदुकीची धाक.
प्रतिनिधी सचिन श्रीवास्तव



नवी मुंबई:- नवी मुंबईतील कोपरखैरणे सेक्टर २३ मधील एका सोसायटीच्या गेटसमोर गाडी उभीकरणाऱ्यांना रहीवाशांनी मनाई केल्याने याचा राग आलेल्या वाहनचालकांनी मित्रासमवेत दुचाकीवर येत हातात रिव्हाॅल्व्हर घेवून रहीवाशांना धमकवाल्याची घटना  २ ऑगस्ट रोजी रात्री च्या सुमारास घडली आहे. आपली चार चाकी गाडी घेवून गेल्यानंतर नंतर काही वेळाने परत येऊन त्यांनी हे कृत्य केल्याचे आरोप रहिवाशांनी केले आहे.  ही  घटना सोसायटीच्या  CCTV मध्ये कैद झाली आहे. त्यामुळे खुलेआम अशा प्रकारे हातात बंदूक धमकावल्याने राहिवाशांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. या प्रकरणी कोपरखैरणे पोलीस स्टेशनला गुन्ह्याची नोंद झाली आहे. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास  करीत आहेत.